आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखपत्र पाहून गोळीबार; इराकमध्ये 14 शिया ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिकरित - इराकमध्ये दहशतवाद्यांनी महामार्गावरील टॅँकर अडवून 14 चालकांवर गोळ्या झाडल्या. राजधानी बगदादपासून 160 कि.मी. अंतरावरील सुलेमान पेकमध्ये हा हल्ला झाला. मृत सर्व चालक शियापंथीय होते.
याव्यतिरिक्त इराकमध्ये आणखी दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले, यात 13 जणांचा मृत्यू झाला. त्याआधी बंदूकधार्‍यांनी बगदाद-मोसूल मार्गावर तिकरितमध्ये मिनी बस अडवून चार जवानांची हत्या केली. अन्य एका घटनेत मोसूलपासून 50 कि.मी. अंतरावरील शूरामध्ये ट्रकमधील दहशतवाद्यांनी एका तपास नाक्यावर हल्ला चढवला.

रविवारी बगदादमधील तुरुंग फोडून कैदी पसार झाल्यानंतर हिंसाचार वाढला आहे. तुरुंग फोडल्याची जबाबदारी अलकायदा व सिरिया तसेच इराकी शाखेच्या संयुक्त संघटनेने घेतली होती. इराकमध्ये जुलै महिन्यात दहशतवादी हल्ल्यात 720 हून जास्त नागरिक ठार झाले आहेत.