आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मुसळधार पावसाच्या तडाख्याने रशियात 141 जणांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियाच्या दक्षिण भागतील क्रेसनोडर भागात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळॆ 141 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भयंकर पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे देखील वृत्त आहे.
क्रेसनोडर, गेलेंडजिक आणि नोवोरोसिस्क या भागातील बरीच शहरे या पुरामुळॆ प्रभावित झाली असून, 57 हजार लोकसंख्या असलेलल्या क्रिम्स्क परिसराला पुराचा जोरदार तडाखा बसला आहे.
रशियाच्या मंत्रालयानुसार, मोठ्या प्रमाणावर प्रभावित क्रिम्स्क परिसरातून पोलिसांनी अत्तापर्यंत 300 जणांना वाचवले आहे. त्यात 150 मुलांचा सामावेश आहे. सध्या या भागात युध्दपातळीवर मदत कार्य करण्यासाठी सहाशे पोलिस कार्यरत आहेत. क्रेसनोडर प्रांताचे गर्वनर अलेक्जेंडर तकाचयोव यांनी नऊ जुलै रोजी पुरप्रभावित लोकांसाठी शोक दिवस पाळण्याची घोषणा केली आहे.