आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 15 Killed As Egyptian Forces Clear Pro Morsi Protest Camps

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काहिरामध्ये मुर्सी समर्थकांवर गोळीबार, 15 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इजिप्तची राजधानी काहिरामध्ये मोहम्मद मुर्सी यांचे समर्थक ज्या ठिकाणी निदर्शने करीत होती ती सुरक्षा रक्षकांनी बंद केली असून आंदोलकांना पिटाळून लावले आहे. यावेळी आंदोलक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत 15 जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी बेछूट गोळीबार केला. तसेच, त्यांच्या दिशेन बुलडोझर चालवण्यात आले. घटनास्थळी हेलिकॉप्टरही घिरट्या घालत होते. सुरक्षा रक्षकांनी सुरवातीला अश्रूधुराच्या नळकांडा फोडल्या.

इजिप्तच्या गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवदेनात म्हटले आहे, की सुरक्षा रक्षकांनी काहिराच्या पूर्वेकडील रब्बा-अल-अदाविया मस्जिद आणि पश्चिमेकडील नाहदा चौकातील आंदोलकांविरोधात योग्य कारवाई करण्यात आली आहे.