आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंकन यांच्याबाबत 150 वर्षांनंतर चुकीची दुरुस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पत्रकारितेच्या इतिहासात सर्वात जुन्या चुकीची दुरुस्ती करण्यात आली आहे. तत्कालीन पेट्रियट न्यूजच्या संपादकीयमध्ये दिवंगत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या जीट्सबर्गच्या भाषणाची खिल्ली उडवण्यात आली होती. भाषण मूर्खपणाचे ठरवणे आमची चूक होती, अशी उपरती आताच्या हॅरिसबर्ग पेपर वृत्तपत्राला झाली आहे. लिंकन यांच्या जीट्सबर्गमधील ऐतिहासिक भाषणाला मंगळवारी दीडशे वष्रे होत आहेत. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्राने हा खुलासा केला आहे.
काही वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी लिंकन यांच्या जीट्सबर्गमधील भाषणाला दोषयुक्त ठरवत टीका केली होती. आमच्या ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये यापुढे असा उल्लेख राहणार नाही, असे हॅरिसबर्ग पेपरने म्हटले आहे.
पक्षपातीपणा किंवा दारूच्या नशेत आमच्या पूर्वजांनी राष्ट्राध्यक्ष लिंकन यांच्या भाषणावर मूर्खपणाची शेरेबाजी केली होती. पेनेन्सुलातील या वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये 24 नोव्हेंबर 1863 मध्ये संबंधित टिप्पणी करण्यात आली होती.