आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 16 year old Arrested On Charges Of Killing Sikh Elderly

ओक क्रीक गुरुद्वाराच्‍या सदस्‍याची गोळ्या घालून हत्‍या, अल्‍पवयीन मुलास अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्‍टन- काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील विस्‍कॉन्‍सीन येथील ओक क्रीक गुरुद्वारामध्‍ये माथेफिरुने केलेल्‍या गोळीबारात 6 शीख नागरिकांचा मृत्‍यू झाला होता. त्‍याच गुरुद्वाराचे सदस्‍य दलबीरसिंग यांचीही एका गोळीबाराच्‍या घटनेत हत्‍या करण्‍यात आली. याप्रकरणी एका 16 वर्षीय अल्‍पवयीन मुलाला अटक करण्‍यात आली आहे.
डिएन्‍जेलो विलियम्‍स असे या अल्‍पवयीन आरोपीचे नाव आहे. विलियम्‍सने बुधवारी रात्री 9.15 वाजता हार्मनी फूड स्टोअरजवळ दलबीरसिंग यांची गोळीबार करुन हत्या केली. हार्मनी फूड स्टोअर दलबीरसिंग यांचा पुतण्या जतिंदरसिंग यांच्या मालकीचे आहे. स्‍टोअर चालविण्‍यत ते पुतण्‍याची मदत करीत होते. घटना घडली त्‍यावेळी ते पुतण्‍यासोबत होते. दुकान बंद करताना काही वात्रट मुले दुकानात शिरले आणि त्‍यांनी जतिंदर यांच्‍यावर बंदूक रोखली. त्‍यांना विरोध करुन जतिंदर आणि दलबीर यांनी कसा बसा दुकानात प्रवेश करुन दार बंद करण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, एका जणाने गोळीबार केला आणि त्‍यात दलबीरसिंग यांचा मृत्‍यू झाला.
जतिंदर यांनी विलियम्‍सची ओळख पटविली. प्राणघातक शस्त्र बाळगणे आणि लोकांना ठार मारण्याचा आरोप विल्यम्सवर ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली त्याला सुमारे 70 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो.
विस्‍कॉन्‍सीन गुरुद्वारात गोळीबार करणा-या वेडने केली होती आत्‍महत्‍या
गुरुद्वारात गोळीबार करणारा हल्लेखोर अमेरिकी सैन्यात होता