आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Full Story Of Lindt Cafe Opration Read More At Divya Marathi.com

सिडनी हल्ला : वाचा, ओलिस नाट्याचा संपूर्ण 17 तासांचा घटनाक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - सिडनीतील लिंट चॉकलेट कॅफेमधील ओलिस नाट्य अखेर 17 तासांनंतर संपले आहे. बंधक बनवण्यात आलेल्या सर्व ओलिसांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. ओलिस ठेवण्यात आलेल्या नागरकांमध्ये 2 भारतीय नागरीकांचादेखील सामावेश होता. यामध्ये भारतीय वंशाचा इंफोसिसमधील कर्मचारी अंकित रेड्डी याचा सामावेश होता. सुटका झाल्यानंतर अंकितने भारतात असलेल्या कुटूंबियांसोबत चर्चा करून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले.
ऑपरेशनमध्ये अनेक लोक जखमी

भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 4.00 वाजण्याच्या सुमारास सिडनीतील मार्टिन प्लेस येथील लिंट कॅफेमध्ये 40 नागरीकांना ओलिस ठेवण्यात आले. ऑस्ट्रेलिया मीडियाने हल्लेखोर हा एक ईराणी शरणार्थी शेख हारुन मोनिस अशी असल्याची घोषणा केली. मोसिस हा एखाद्या कट्टरपंथी संघटनेशी जोडलेला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्याच्यावर याआधी देखील अनेक क्रिमिनल केस असल्याची नोंद असल्याचे ऑस्ट्रेलियन पोलिसांनी स्पष्ट केले.


सकाळी 4 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंतचा घटनाक्रम, संपूर्ण घटनाक्रम भारतीय वेळे नुसार

सकाळी 4.00 वाजता

काळ्या रंगाचे हाफ जॅकेट आणि टोपी घातलेला हल्लेखोर कॅफेमध्ये घुसला. यावेळी त्याच्याकडे एक बॅग होती. यानंतर त्याने कॅफेतील उपस्थित सर्व नागरीकांना बंधक बनवले. बंधक बनवलेल्या एका नागरीकाच्या हातात एक झेंडा होता त्यावर अरबी भाषेतील संदेश लिहण्यात आलेला होता.
सकाळी 5.00 वाजता

या घटनेची सुचना एका अज्ञात इसमाने स्थानिक पोलिसांना दिली. तेथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शिने सांगितले की, कॅफेच्या आत साधारण 20 नागरीकांना ओलिस ठेवण्यात आले आहे. बंधक बनवलेल्या काही नागरीकांना कॅफेच्या खिडकीतून पाहण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर पोलिसांनी कॅफेला चारही बाजूंनी घेरले.

सकाळी 6.00 वाजता

सकाळी 6 च्या सुमारास पोलिसांनी मार्टिन प्लेस पुर्णपणे रिकामे करण्यास सुरूवात केली. तसेच सिडनीतील ओपेरा हाउसदेखील रिकामे करण्यात आले. कॅफेच्या खिडक्यांमध्ये उभे असलेले कॅफेतील कर्मचारी काचेवर हात ठेवून मदत असल्याचे बघितले गेले. यानंतर हल्लेखोराने एका बंधकाच्या हातात झेंडा फडकवण्यास दिला. या झेंड्यावर अरबी भाषेत एक संदेश लिहण्यात आलेला होता. संदेश अस्पष्ट असल्याने त्याचा अर्थ लावणे पोलिसांना शक्य झाले नाही.
सकाळी 7.00 वाजता

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबॉट यांनी कॅबिनेटची नॅशनल सिक्युरिटी बैठक बोलवली आणि घटनेचा आढावा घेतला. यानंतर लिंट चॉकलेट कॅफेपासून 400 मीटर अंतरावर असलेले 'सिडनी इंडियन काउंसलेट रिकामे करण्यात आले.

सकाळी 8.00 वाजता

हल्लेखोराच्या हातात असलेल्या झेंड्यावरील संदेश वाचण्यात यश आले. यावर अरबी भाषेत लिहिले होते की, येथे अल्लाहशिवाय कोणताच देव नाही आणि मोहम्मद त्याचे दूत आहेत.यानंतर येथील रेडियो चॅनलवरील टॉकबॅक कार्यक्रमाचे होस्ट रे हेडली यांनी कॅफेतील एका बंधकाशी बोलणे झाल्याचा दावा केला. ते म्हणाले की, हल्लेखोर त्यांना निर्देश देत आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंतचा घटनाक्रम