आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंडच्या लष्करी तळावर हल्ला, 17 दहशतवादी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पट्टानी - थायलंडच्या दक्षिण भागातील नाराथिवाट येथील लष्करी तळावर आज (बुधवार) दहशतवाद्यांनी हल्ला केला. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज 100 हून अधिक दहशतवाद्यांशी दुपारी 12 पर्यंत चकमक सुरु होती. यात 17 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, जवळपास 100 दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला केला. ते अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. अनेक विनाशकारी हत्यारे त्यांच्याकडे होती. लष्कराने दहशतवाद्यांना तोडीसतोड उत्तर दिले. यात काही जवान जखमी देखील झाले आहेत.