आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOGRAPHY DAY: तुम्‍ही पाहिले आहेत का? ऐतिहासीक दुर्मिळ छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 ऑगस्‍ट हा दिवस 'वर्ल्ड फोटोग्राफी डे' म्‍हणून जगभर साजरा केला जातो. या दिनानिमित्त जगभरातील फोटोग्राफरचा सन्‍मान केला जातो. फोटोग्राफर हा दिवस एखाद्या उत्‍सावासारखा साजरा करतात.
का साजरा केला जातो वर्ल्ड फोटोग्राफी डे-
'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ची सुरूवात 1839 मध्‍ये डॉगेरोटायीप प्रक्रियेच्‍या घोषणे बरोबर झाली. या फोटोग्राफी प्रक्रियेचा शोध जोसेफ नायसफोर आणि लुयीस डॉगेरो यांनी लावला. काही महिन्‍यानंतर 19 ऑगस्‍ट 1839 मध्‍ये 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ची घोषणा फ्रान्‍स सरकारने केली. यादिवशी जगातिल पहिल्‍या फोटोवर प्रक्रिया करण्‍यात आली होती. या दिवसाची आठवण म्‍हणून 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ची सुरूवात झाली. मात्र, 2010 मध्‍ये ख-या अर्थाने जगभर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. सुरूवात ऑस्‍ट्रोलियाचा फोटोग्राफर कोर्स्‍के आणि त्‍याच्‍या मित्रांनी फोटोग्राफीचा प्रचार आणि प्रसार करण्‍यासाठी केली. या दिनाचे औचित्‍य साधून जगभरातील 270 फोटोग्राफरच्‍या छायाचित्रांचे संकलन करून ऑनलाइन गॅलरी तयार करण्‍यात आली. या गॅलरीचा उद्देश जगभरातील फोटोग्राफरच्‍या फोटोंचा प्रसार आणि प्रचार करणे आहे.
'वर्ल्ड फोटोग्राफी डे' च्‍या निमित्ताने तुम्‍ही कधीच न पाहिलेली काही ऐतिहासीक छायाचित्रे पुढील स्‍लाईडवर...