आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 18 Thousand Passes Distributed For Modis Speech In Madison Square Garden

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत मोदींना ऐकण्यासाठी 40 हजार उत्सुक, जागा मात्र केवळ 18 हजारांसाठीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : मोदींच्या अमेरिका दौ-यासाठी अमेरिकेत राहणा-या भारतीयांनी ने वेबसाइट तयार केली आहे. त्या वेबसाईटद्वारेच कार्यक्रमांचे पास वितरित केले जाणार आहेत. या साईटवर पास संपल्याची सूचना देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये 28 सप्टेंबरला भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आणि त्या ठिकाणच्या भारतीयांना मार्गदर्शन करणार आहेत. मोदींच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 40 हजार लोक इच्छुक होते. पण मर्यादीत पास असल्याने केवळ 18 हजार लोकांनाच कार्यक्रमात सहभागी होता येईल. कार्यक्रमात पास मिळवण्यात अपयश आलेल्या लोकांनी पास वाटपाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यासंदर्भात आमची गुजराती बेवसाईट दिव्यभास्कर.कॉम (divyabhaskar.com) ने इव्हेंटचे आयोजक डॉक्टर भरत बराई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. डॉ. बाराईने सांगितले की, पास वाटपात पूर्णपणे पारदर्शकपणा ठेवण्यात आला आहे. 18 हजार जागांवर 40 हजार लोकांना तर बसवता येणार नाही. 18 हजार पैकी 17300 पास मोफत वाटण्यात आले. तर 700 पास कार्यक्रमाच्या प्रायोजकांना देण्यात आले. सुमारे 350 पास पाहुणे, 550 पास माध्यम प्रतिनिधी, 350 पास मोदींबरोबर येणारे पाहुणे, 300 पास आयोजन समितीचे सदस्य आणि 800 पास स्वयंसेवकांसाठी ठेवण्यात आले आहे.
डॉ. भरत बाराई यांनी यावेळी पास वाटपाची संपूर्ण प्रक्रिया दिव्य मराठीला समजावून सांगितली. पास वाटपासाठी ऑनलाइन पद्धत वापरण्यात आली होती. ज्यांना कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते, त्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आले. एक सप्टेंबरला रजिस्ट्रेशन बंद झाले. भरत यांच्या मते, अमेरिकेत 400 हून अधिक इंडो-अमेरिकन संस्था आहेत. त्यांच्याबाबत अमेरिकन दुतावासाकडे माहिती मागवण्यात आली होती. त्यानंतर आम्ही आमच्या आमच्या पातळीवर व्हेरीफीकेशन केले. त्यांनंतर 14 हजार पास रजिस्ट्रेशननुसार वाटप करण्यात आले. त्यानंतर जे लोक अशा संस्थांचे सदस्य नव्हते, त्यांच्यासाठी दुस-यांदा रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले. त्यानंतर एक हजार पास लॉटरी पद्धतीद्वारे वाटप करण्यात आले.
जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, त्यावेळी सर्वांनाच खुश करणे शक्य नसते. पास वाटप बंद झाल्याने रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख माहिती नसल्याने तारीख वाढवण्यात यावी, असे अनेकांचे म्हणणे आहे. पण बाराई यांच्या मते, 'मोदींच्या अमेरिका दौ-याबाबत अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत. तसेच या पास वाटप प्रक्रियेबाबतही लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यात आली होती. त्यामुळे आता पास वाटप शक्य नाही.'
मेडिसन स्क्वेअर गार्डन हॉलमध्ये समोरच्या जागांवर बसण्यासाठीही काही लोक 15 ते 20 हजार डॉलर खर्च करण्यास तयार असल्याची माहितीही मिळते आहे. पण या गोष्टी निरर्थक असून आसन व्यवस्था आधीच ठरलेली असल्याचे बाराई यांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर पाहा, पास वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेली वेबसाईट आणि कार्यक्रम स्थळाचे PHOTO