आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 व्या वर्षीच अमेरिकेची सिनेट सदस्य बनली गे मॅरेज-अबॉर्शन ची विरोधक सायरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सायरा ब्लेयर

वॉशिंग्टन - 18 वर्ष वय असणा-या सायरा ब्लेयरने अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत विजय मिळवत सर्वांना धक्का दिला आहे. सायराने रिपब्लिकन पार्टीतर्फे निवडणूक लढवली होती. तिच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठ्या असलेल्या डेमोक्रॅट लेन डेहल यांना सायराने 33 टक्के मतांनी पारभूत केले. त्यामुळे ती अमेरिकेतील सर्वात कमी वयाची स्टेट लॉ मेकर बनली आहे. सायरा वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. वेबसाईटवरील माहितीनुसार तिचा अबॉर्शनचा अधिकार आणि गे मॅरेजला विरोध आहे.
प्राथमिक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सायरा चर्चेत आली होती. या निवडणुकीत तिने 66 वर्षांच्या रिपब्लिकन उमेदवाराचा पराभव केला होता. लेन डेहलने सायराच्या विजयानंतर म्हटले होते की, 17-18 वर्षांची मुलगी ज्याप्रमाणे समोर आली आहे, ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यास मदत होईल. सायरा विकासासाठी चांगले काम करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.
असेंबलीत जाण्यासाठी एक सेमेस्टर सोडणार
निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सायरा म्हणाली की, वेस्ट व्हर्जिनियामध्ये आज इतिहास घडला आहे. मला मोठा अभिमान वाटत आहे. आम्ही सर्वांनी मिळून हा विजय मिळवला. आता माझे पूर्ण लक्ष राज्याच्या चांगल्या भविष्याकडे असेल. सायराने स्प्रिंग सेमेस्टर सोडून असेंबलीत जाणार असल्याचे सांगितले. असेंबली 60 दिवस चालेल त्यानंतर पुन्हा क्लास करणार असल्याचे ती म्हणाली.

ताज्या निकालांनंतरची स्थिती
सिनेट (100 जागा)
रिपब्लिकन52
डेमोक्रॅट45
गेल्यावेळचे निकाल
रिपब्लिकन45
डेमोक्रेटिक53

हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह 435 जागा
रिपब्लिकन242 वर आघाडी
डेमोक्रॅटिक176 वर आघाडी

गव्हर्नर
रिपब्लिकन31
डेमाक्रॅटिक15
(चार राज्यांतील निकाल अद्याप आलेले नाहीत)
पुढील स्लाइड्सवर पाहा सायरा ब्लेअरचे Photo आणि वाचा अमेरिकेतील निवडणुकांबाबत...