आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 19 Indian Fishermen Arrested In Srilanka, Five Boats Recovered

श्रीलंकेत 19 भारतीय मच्छीमारांना अटक, पाच बोटी जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारी करणा-या 19 भारतीय मच्छीमारांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडील पाच बोटी जप्त करण्यात आल्या. उत्तर जाफना द्वीपकल्पात शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आल्याची माहिती नौदलाचे प्रवक्ते कमांडर कोसला करनकुलसुरिया यांनी दिली.
भारतीय मच्छीमारांनी सागरी सीमा ओलांडून मासेमारी केल्यामुळे त्यांना अटक केल्याची माहिती करनकुलसुरिया यांनी दिली. मच्छीमारांना कनकेसंतुराई बंदराकडे नेण्यात आले आहे. मच्छीमारांच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये नुकत्याच झालेल्या कराराचा परिणाम होताना दिसत नाही. बैठकीनंतर आतापर्यंत अटक केलेल्या मच्छीमारांची संख्या 57 झाली आहे.
रामेश्वरम, जगथापट्टीनम आणि कोत्तिपट्टनम भागातील जवळपास 4000 मच्छीमार शनिवारी रात्री मासेमारीसाठी सागरात गेले होते. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. श्रीलंका नौदलाचे जवान तीन बोटींतून आले आणि त्यांनी कात्छतिऊ बेटाजवळ मच्छीमारांना ताब्यात घेतल्याची माहिती अधिका-यांनी दिली. परराष्‍ट्रमंत्री सलमान खुर्शीद आणि त्यांचे श्रीलंकेतील समपदस्थ जी. एल. पेरिस यांच्या गेल्या महिन्यातील बैठकीत मच्छीमारांच्या कामात विनाअडथळा सहकार्य करण्याचे ठरले होते.