आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

84 ची शीख दंगल म्हणजे सामूहिक हत्याकांड नाही, ओबामा प्रशासनाचा स्पष्ट निर्वाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सन 1984 मध्ये दिल्लीत शीख समुदायाविरोधात उसळलेल्या दंगली म्हणजे मानवी हक्काची पायमल्ली झाली परंतु तो सामूहिक
हत्याकांड अथवा नरसंहार नव्हता असा स्पष्ट निर्वाळा ओबामा प्रशासनाने दिला आहे. ओबामा प्रशासनाच्या या निर्णयाने अमेरिकेतील खलिस्तानवादी समर्थक गटांना जबर धक्का बसला आहे. पाकिस्तानची फूस असलेल्या स्वतंत्र खलिस्तानसाठी चळवळीने 80 च्या दशकात पंजाबमध्ये हाहाकार उडवला होता.
सन 1984 च्या शीखविरोधी दंगली म्हणजे ‘सामूहिक हत्याकांड’ ठरवण्यात यावे यासाठी ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तानवादी गटाने पाच महिन्यांपूर्वी ऑनलाइन याचिकेसाठी जोरदार प्रचारमोहीम उघडली होती.ऑनलाइन प्रचारमोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर व्हाइट हाऊसने दंगलीचा आढावा घेऊन आपला निकाल दिला. सन 84 ची शीख विरोधी दंगल सुरू असताना आणि नंतरही अमेरिकेने या हिंंसाचाराचा आढावा घेतला होता.अत्याचार आणि मानवी हक्कांची पायमल्ली त्यावेळी झाल्याचेही स्पष्ट केले होते एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधात हिंसाचाराचा अमेरिकेने नेहमीच निषेध केला आहे. जगभरातील नागरिकांचे स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्याचेच अमेरिकेचे परदेश धोरण आहे.अल्पसंख्याक समुदायाविरोधात जगभरात होणार्‍या अत्याचाराविरोधात आमचे मुत्सद्दी नियमितपणे अहवाल देत असतात, अशा शब्दात ऑनलाइन याचिकेवर व्हाइट हाऊसने याप्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे.

नोव्हेंबरात याचिका
15 नोव्हेंबर 2012 रोजी खलिस्तानवादी गटाने ऑनलाइन प्रचार मोहीम सुरू केली आणि आठवडाभरातच त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल 30 हजार नेटिझन्सनी त्याला पाठिंबा देऊन याचिकेवर स्वाक्षर्‍या केल्या.
समर्थक निराश
अलीकडेच 84 च्या दंगलीतील मृतदेह सापडले होते, तरीही शिखांच्या सामूहिक हत्याकांडाविरोधात ठाम भूमिका घेण्यात ओबामा प्रशासन अपयशी ठरले आहे. अशी नाराजी खलिस्तान समर्थक गटाचा प्रमुख गुरपतवंत एस.पनुन याने व्यक्त केली.

२५ हजार लोकांच्या स्वाक्षर्‍या असल्यास अमेरिकी सरकार ऑनलाइन याचिकेचा आढावा घेते आणि त्यावर आपला निकाल अथवा उत्तर देते.

चार दिवस हिंसेचे
31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यादिवशी रात्रीपासूनच शीखविरोधी हिंसाचारास सुरुवात झाली.त्यानंतर सतत तीन दिवस दिल्ली धगधगत होती.1 ते 3 नोव्हेंबर या दरम्यान सुमारे 3 हजार शीखांचे शिरकाण करण्यात आले असा अंदाज आहे.
442 जणांना शिक्षा
या दंगली प्रकरणी शिक्षा झाली. त्यापैकी 49 जणांना जन्मठेप, तर अन्य तिघांना 10 वर्षांची कैदेची शिक्षा झाली. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सहा पोलिस अधिकार्‍यांनाही शिक्षा करण्यात आली होती.