लंडन - अमेरिकतील अॅपल कंपनीने आयरिश स्टेटकडून बेकायदेशीर निधी वसूल केला असल्याचा आरोप युरोपियन युनियनने केला आहे. गेल्या दोन दशकांपासून छुप्या टॅक्सद्वारे ही वसुली अॅपल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयर्लंडमधील अॅपल कंपनीच्या टॅक्सविषयीच्या बाबींची चौकशी युरोपियन कमिशनने केली आहे.
यात कंपनी २ टक्क्यांपेक्षाही कमी टॅक्स भरत असल्याचे फायनान्शियल टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. अॅपलचे युरोपातील मुख्यालय आयर्लंडमध्ये आहे. येथे कंपनीने ४००० लोकांना रोजगार दिला आहे. हाच भाग
फेसबुक, अॅमेझॉन, पेपल व
ट्विटर सारख्या कंपन्यांचेही केंद्र आहे. मात्र फक्त अॅपललाच सूट देण्यात आली असून इतर कंपन्यांसाठी टॅक्सचे दर १२.५ % आहे.