आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरले होते आळीपाळीने डुलकी घेण्‍याचे, तरीही विमानामध्‍ये घडले असे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमान आकाशत उंच उडत असताना प्रवाशांची जीव धोक्‍यात टाकून वैमानिकांनी डुलकी घेण्‍याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. या वैमानिकांनी ही बाब मान्‍य केली आहे. डुलकी घेताना त्‍यांनी तब्‍बल 325 प्रवाशांचा जीव धोक्‍यात टाकला होता.

ही घटना ब्रिटनच्‍या एअरलाईन्‍सच्‍या विमानत घडली. या एअरलाईन्‍सचे एअरबस ए330 जातीचे विमान दोघे उडवत होते. दोघांनी आळीपाळीने डुलकी घेण्‍याचे ठरविले होते. मात्र, दोघेही झोपले. एका वैमानिकाला जाग आल्‍यानतर त्‍याला दुसरा वैमानिकही झोपलेला दिसला. विमान ऑटो पायलट मोडवर टाकून दुसरा वैमानिकही झोपून गेला. दोघे किती वेळ झोपले होते, याची कल्‍पनाच आली नाही. तोपर्यंत विमान इश्‍वराच्‍याच भरवशावर उडत होते. विमानातील 325 प्रवाशांचा जीव मात्र धोक्‍यात आला होता.