आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Year Old Child Had A Cardiac Arrest On Flight At Boston

विमान प्रवास करताना 2 वर्षांच्या बालकाला हार्ट अटॅक, वैमानिकाने केले इमरजन्सी लॅंडिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोस्टन- पिटर्सबर्ग येथून बोस्टनला जात असलेल्या विमानातून प्रवास करीत असलेल्या दोन वर्षांच्या बालकाला हृदयविकाराचा झटका बसला. त्यानंतर लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर वैमानिकाने इमजन्सी लॅंडिंग केले.
यासंदर्भात मॅसेच्युसेट्स स्टेट पोलिस ट्रुपर मॅथ्यू गुअरिनो यांनी सांगितले, की विमानाने लॅंडिंग केल्यानंतर मुलाला अॅम्बूलन्सच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. लॅंडिंग करण्यापूर्वीच वैमानिकाची याची माहिती विमानतळ कक्षाला दिली होती. त्यामुळे विमानतळावर अॅम्बुलन्स तयार ठेवण्यात आली होती. तसेच हॉस्पिटलला जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक थांबवली होती. बालकाला दाखल केल्यानंतर या विमानात असलेले त्याचे वडील आणि भावाला रुग्णालयात नेण्यात आले.
बालकाच्या प्रकृतीसंदर्भात अधिक माहिती मिळालेली नाही. बोस्टर शहरातील निधम या भागातील हे बालक आहे.