आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव तारी त्याला कोण मारी: लंडनमध्‍ये 20 फुटांहून बाळ पडले! बचावले !!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय ब्रिटनमधील एका दांपत्याला नुकताच आला. त्यांचे 23 महिन्यांचे बाळ आपल्या बेडवरून उसळी मारून 20 फूट खोल पडल्याची घटना घडली. सुदैवाने बाळाचा जीव वाचला.


लिओ फर्नांडो असे या बाळाचे नाव आहे. लिओ त्याचा मोठा भाऊ जयहान आणि वडील अँटोनी यांच्या सोबत बेडवर धमाल-मस्ती करत होता. त्याच वेळी तो जोराने धावताना खोलीच्या खिडकीतून बाहेर फेकला गेला. बेडवरून उसळी मारल्याने तो खोलीबाहेर पडला. खोलीचे अंतर जमिनीपासून सुमारे वीस फूट उंच होते. लिओने उसळी मारल्यानंतर अँटोनी यांनी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. काही क्षणांत लिओचा आवाज ऐकून त्याची आई एम्मा बाहेर आल्या. ‘अरे देवा, लिओ खिडकीतून पडला’ असे एम्मा मोठ्याने ओरडल्या. एम्मा यांनी त्याला लगेच उचलून अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली. त्या वेळी लिओच्या डोळ्यातून रक्त निघाल्यासारखे दृश्य पाहून त्यांचे आईचे काळीज पाणी पाणी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात लिओचा एक्स-रे काढण्यात आला. त्यात शरीरातील कुठलेही हाड मोडले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एम्मा व अँटोनी यांचा जीव भांड्यात पडला. या घटनेत त्याला थोडी जखम झाली. त्याच्या गुडघा आणि कपाळाला जखम झाली आहे. मात्र पोटच्या मुलाला या मोठ्या संकटात सुखरूप पाहून त्याच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला.