आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20 School Students Stabbed In Pittsburgh Latest International News In Marathi

अमेरिकेत माथेफिरूने 20 शाळकरी मुलांना धारदार चाकूने भोकसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिट्सबर्ग- अमेरिकेतील पिट्‍सबर्ग येथील एका हायस्कूलमध्ये आज (बुधवार) सकाळी एका माथेफिरू युवकाने 20 विद्यार्थ्यांना धारदार शस्त्राने भोकसल्याच्या घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना ‍तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थीर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

हल्लेखोराला पोलिसांनी अटल केली असून त्याची कसून चौकशी घेतली जात आहे. शाळकरी मुलांवर हल्ल्यामागे हल्लेखोरांचा काय उद्देश होता, याचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळीची वेळ होती. सगळे विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. मात्र, अचानक युवकाने एका वर्गात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला चढविला. हल्लेखोराने 20 विद्यार्थ्यांव धारदार चाकूने वार केले. सगळे विद्यार्थी 14 ते 17 वयोगटातील आहे. दिवसाढवळ्या शाळेत हल्ला झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.