आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20 Students Injured In US School Stabbing News In Marathi

अमेरिकन शाळेत रक्तपात, 21 विद्यार्थ्यांना भोसकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरिस्व्हिले (अमेरिका) - अमेरिकेतील एका किशोरवयीन मुलाने रागाच्या भरात शाळेतील 21 मुलांना भोसकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी झालेल्या हल्ल्यामुळे शाळेच्या आवारात अक्षरश: रक्ताचे पाट वाहत होते. जखमींमध्ये सुरक्षा रक्षकासह 22 जणांचा समावेश आहे. उपमुख्याध्यापकांनी तत्काळ या मुलावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

अ‍ॅलेक्स हिबल असे या 16 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी घरातून निघताना त्याने दोन चाकू सोबत घेतले. तो शिकत असलेल्या पीट्सबर्ग येथील शाळेत येताच त्याने समोर येईल त्या विद्यार्थ्यास चाकूने भोसकण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात 21 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. धारदार चाकूने कुणाचे यकृत चिरले गेले, तर कुणाचे पोट अक्षरश: कापून निघाले.

कॅलिफोर्नियातील गुंडाकडून 40 खुनांची कबुली
सुपारी घेऊन खून केल्याचा आरोप असलेल्या कॅलिफोर्नियातील एका गुंडाने आतापर्यंत 40 खून केल्याची कबुली दिली आहे. जोस मॅन्युअल मार्टिन्झ नावाच्या 51 वर्षीय गुंडावर 9 खून केल्याचा आरोप होता. मात्र, चौकशीदरम्यान त्याने गेल्या दशकभरात 40 खून केल्याची कबुली दिली आहे. मागील वर्षी मेक्सिकोची सीमा पार करून अ‍ॅरिझोनामध्ये येताना त्याला अटक करण्यात आली होती. त्या वेळी त्याच्यावर एका खुनाचा आरोप होता. मात्र, नंतर झालेल्या चौकशीदरम्यान तो एक कुख्यात खुनी असल्याचा संशय बळावला होता.

मला मरायचे होते... : शाळेत प्रवेश करताच एकानंतर एक विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करणार्‍या अ‍ॅलेक्सची अमेरिकन न्यायालयात कसून चौकशी करण्यात आली. या वेळी तो प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे आढळून आले. मला मरायचे होते, असेही तो म्हणाला. मात्र, अ‍ॅलेक्सची आजवरची वागणूक पाहता तो एक चांगला मुलगा असून इतर सर्व मुलांमध्ये मिळून-मिसळून वागत होता.