आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 200 Year Old Mummified Buddhist Monk Is Not Dead

न सुटलेले कोडे! 200 वर्षांचे भिक्षू आजही जिवंत, ममी समजून विकण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगोलिया - मंगोलियाच्या सोंगिनो खैरखान प्रांतात 27 जानेवारी रोजी एका बौद्ध भिक्षूची ममी सापडली आहे. ही ममी सर्वांसाठीच कोडे ठरत आहे. ही ममी नसून 200 वर्षांचे जिवंत बौद्ध भिक्षू असल्याचा दावाही केला जात आहे. येथील स्थानिक वृत्तपत्र सायबेरियन टाइम्सने एका ज्येष्ठ बौद्ध भिक्षूच्या हवाल्याने म्हटले आहे, की भिक्षू मृत नसून 'पद्मासना'त बसून ध्यानधारणेत आहे.
प्रसिद्ध बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचे डॉक्टर बॅरी केर्जीन यांच्यासह अनेक तज्ञांनी भिक्षू 'तुकदम' ध्यान मुद्रेत असल्याचा दावा केला आहे. तर, काही तज्ञांच्या मते येथील थंड वातावरणामुळे ममी एवढी वर्षे सुरक्षीत राहीली असण्याची शक्यता आहे. डॉ. बॅरी केर्जीन यांनी सांगितले, की साधारण तीन आठवडे 'तुकदम' मुद्रेत राहिल्यानंतर व्यक्ती अशा अवस्थेत जाते. त्या व्यक्तीचे शरीर हे आपल्याला जाणवते परंतू त्याला त्याची किंचितही जाणीव नसते. त्याचे केस, नखे आणि कपडे तेवढे त्याच्या शरीरावर असतात. ही त्याची बुद्धत्वाच्या जवळ जाण्याची अवस्था असते, असे डॉ. केर्जीन यांनी सांगितले.
गुहेत सापडले ध्यानस्थ भिक्षू
येथील कोबस्क प्रांतातील गुहेत एन्थोर नावाच्या व्यक्तीला हे ध्यानस्थ भिक्षू सापडले. त्याने ममी समजून त्यांना त्याच अवस्थेत उचलून प्रथम स्वतःच्या घरी आणले. त्याचा या भिक्षूच्या देहाला ममी समजून काळ्या बाजारात विकण्याचा इरादा होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडले. मंगोलियन कायद्यानुसार एन्थोर दोषी ठरला तर त्याला 12 वर्षांपर्यंत शिक्षा किंवार 26 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

पुढील स्लाइडमध्ये, अशी होती तस्करीची तयारी