आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2015 Is Terrorist Year, Australian Expert Warned

२०१५ दहशतवादाचे वर्ष, ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांनी दिला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - मूलतत्त्ववादी गट आणि अतिरेक्यांचा बीमोड करण्याचे प्रयत्न केले जात असल्याने दहशतवादाचे स्वरूप बदलले आहे. परिणामी २०१५ या वर्षात आणखी हल्ले होण्याची शक्यता असून हे वर्ष दहशतवादाचे वर्ष म्हणून ओळखले जाईल, अशी भीती ऑस्ट्रेलियातील दहशतवादविरोधी तज्ज्ञाने व्यक्त केली आहे.

या वर्षात छोट्या स्वरूपातील अनेक दहशतवादी हल्ले केले जातील, असा इशारा ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठातील क्लार्क जोन्स यांनी दिला आहे. अतिरेक्यांकडून हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा धोका आहे. जोन्स मूलतत्त्ववाद रोखण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय केंद्रातील तज्ज्ञ आहेत. तरुणांना मूलतत्त्ववादापासून परावृत्त करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. गेल्या वर्षभरात दहशतवादाचा चेहरा बदलला आहे.
सध्याची अवस्था आणि यापूर्वीच्या स्थितीत बराच फरक असून दहशतवादाचे स्वरूप बदलत आहे, असे जोन्स यांनी सांगितले. मूलतत्त्ववादाकडे जाण्याचा एकच मार्ग नाही, त्यामुळे दहशतवादी कारवायांत सहभागी प्रत्येकाकडे स्वतंत्रपणे पाहिले जात आहे. काही प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश करून अतिरेकी कारवायांची स्थिती समजून घेतली जाईल, असे जोन्स यांनी सांगितले.

दहशतवाद रोखण्यासाठी ६३ कोटी डॉलर निधी
दहशतवादविरोधी कार्यक्रमात विविध व्यक्तींना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. याशिवाय अन्य तज्ज्ञांनाही सोबत घेतले जाणार आहे. संशयित लोकांना तुरुंगात टाकणे हा उपाय नाही. अशी कृती उत्पादकतेला मारक आहे. जास्तीत जास्त सुरक्षा असणा-या कारागृहांमध्ये त्यांना ठेवणे हा यावरील उपाय नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलिया सरकारने देशांतर्गत दहशतवाद रोखण्यासाठी ६३ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर निधीची घोषणा केली आहे.