Home | International | China | 21 indian are jail in china, international

चीनमध्ये २१ भारतीय दीड वर्षापासून कैदेत

वृत्तसंस्था | Update - Jun 23, 2011, 03:19 AM IST

४० कोटी रुपयांच्या हिऱयांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली २१ भारतीयांना गेल्या दीड वर्षापासून कैद करण्यात आले आहे.

  • 21 indian are jail in china, international

    बीजिंग - ४० कोटी रुपयांच्या हिऱयांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली २१ भारतीयांना गेल्या दीड वर्षापासून कैद करण्यात आले आहे. त्यातील दोघे राजस्थानचे रहिवासी आहेत.
    पाली (राजस्थान) येथील निवृत्त बँक व्यवस्थापकाचा मुलगा राजेश जैन आणि जयपूर येथील अन्य एका युवकाचा यात समावेश आहे. चीनच्या तस्करविरोधी विभागाने त्यांना अटक केली. भारतातील बहुराष्टÑीय कंपनीच्या मार्केटिंगसाठी दोघे चीनमध्ये गेल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयाने केला आहे. तस्करी प्रकरणात मुलांचाही काहीही संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
    पतीच्या सुटकेसाठी चिनी सुनेचे प्रयत्न : चीनच्या तुरुंगात कैद राजेश जैन याची चिनी पत्नी केंग विंग की अर्थात विकिता जैन संघर्षाच्या तयारीत आहे. राजेशला भेटण्यासाठी ती नियमितपणे तुरुंगात जाते तसेच त्याच्या खुशालीची माहिती राजस्थानमधील सासरच्या लोकांनाही ती देत आहे.
    १४ जून रोजी तिने भारतीय कौन्सिलिंग जनरल इंद्रायणी पांडये आणि राष्टÑपती प्रतिभा पाटील यांच्याकडे राजेशच्या सुटकेसाठी विनंती केली. हाँगकाँगमधील राहणाºया केंग विंगने सात वर्षांपूर्वी राजेशसोबत पालीमध्ये विवाह केला.

Trending