आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 22 Countries Support To Sri Lanka For The Human Rights Enquiry, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानवाधिकार तपासाविरुद्ध २२ देश श्रीलंकेच्या पाठिशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - श्रीलंकेतील मानवाधिकार उल्लंघन प्रकरणांच्या तपासाविरोधात २२ देशांनी श्रीलंका सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. यात रशिया, चीन आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. श्रीलंकेत तमिळ टायगर्सविरोधात मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचे उल्लंघन झाले होते. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने याप्रकरणी तपासाचा प्रस्ताव मंजूर केला होता. या राष्ट्रांनी तपासाच्या प्रस्तावाला अवास्तव आणि श्रीलंकेच्या अंतर्गत प्रकरणात दखल देण्याचा प्रकार असल्याचे म्हटले होते.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारतानेही तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. श्रीलंकेत तमिळ टायगर्सविरोधातील अभियानात तमिळी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते. श्रीलंकेविरोधातील तपासाला विरोध करणा-या देशांमध्ये रशिया, चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, इरान, क्यूबा, उत्तर कोरिया, सुदान, दक्षिण सुदान, झिम्बाब्वे आणि युगांडाचा समावेश आहे.