आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 22 Thousand People Feared Contagion, Called For Tests

२२ हजार नागरिकांना घातक संसर्गाचा धोका, वैद्यकीय इतिहासातील सर्वात मोठी घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - एचआयव्हीसारख्या रक्तातून होणा-या घातक विषाणू संक्रमणाची जोखीम पडताळण्यासाठी ब्रिटनमधील जवळपास २२ हजार दंतरुग्णांना तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे. ब्रिटनच्या वैद्यकीय इतिहासात अशा प्रकारची ही सर्वात मोठी घटना मानली जाते.
नॉटिंगहॅमच्या डेब्रुक डेंटल सर्जरीमध्ये गेल्या ३२ वर्षांत डेसमंड डिमेलो यांनी उपचार केलेल्या सर्वांची नव्याने तपासणी केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेने दिलेल्या माहितीनुसार, डिमेलो उपचारांनंतर हात धूत नव्हते तसेच दुस-या रुग्णावर उपचार करण्याआधी ते उपकरणे गरम पाण्यात उकळत नव्हते, असे निदर्शनास आले आहे. जून महिन्यात एका व्हिसलब्लोअरने गोपनीयपणे सलग तीन दिवस डिमेलोंच्या १६६ जणांवरील उपचार पद्धतीचे चित्रीकरण करण्यात आले होते, असा ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे. डिमेलोंचा तपासणी अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह नाही.

रक्त संक्रमण रोखण्यात अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्यामुळे डिमेलो यांच्या रुग्णांना या संक्रमणाची जोखीम तशी कमी आहे, असे एनएचएसने स्पष्ट केले आहे.
उपकरणे स्टाफ टाॅयलेटमध्ये
वैद्यकीय आयोगाने जुलै महिन्यात केलेल्या तपासणीत उपचारादरम्यानच्या संक्रमणाबाबत चिंता व्यक्त केली होती. उपकरणे व अन्य साहित्य ठेवण्यासाठी स्टाफ टायलेटचा वापर केला जात असल्याचे अहवालात म्हटले आहे. माणसाच्या शरीराशी संपर्क आलेल्या या उपकरणामुळे संक्रमणाची जोखीम वाढू शकते. या व्यवसायात नव्याने येणा-या डॉक्टरांना संभाव्य धोक्याची माहिती दिली आहे, असे आरोग्य तपासनिसांनी सांगितले.
१६६ रुग्णांशी संपर्क
एनएचएसमधील डॉ. डोंग ब्लॅक म्हणाले, फेरतपासणीचे वृत्त ऐकून लोकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करताे. संक्रमण होण्याची शक्यता फार कमी आहे, मात्र संक्रमण झालेल्या लोकांना संपर्क साधण्यास मदत मिळेल. चित्रीकरण केलेल्या १६६ रुग्णांना स्वतंत्र पत्र पाठवून उपचारादरम्यान नेमकी स्थिती कशी होती, याची माहिती जाणून घेतली जाईल.
खबरदारी म्हणून झाली फेरतपासणी
संभाव्य संक्रमणाच्या दंतचिकित्सेचा फटका बसलेल्या रुग्णांना संपर्क साधण्यासाठी हॉटलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना फेरतपासणीसाठी बोलावण्याच्या कृतीकडे केवळ काळजीच्या दृष्टिकोनातून पाहावे, असे ब्रिटिश डेंटल असोसिएशनचे अमरजित गिल यांनी सांगितले. डॉक्टर उपचार करताना संसर्गरहित पद्धती, हातमोजे तसेच रुग्णांना मास्क पुरवत असतात याकडे गिल यांनी लक्ष वेधले.