आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 IS Terrorists Killed In Air Strike In Iraq, Divya Marathi

इराक हद्दीत युद्धक विमानांनी केलेल्या कारवाईत कडव्या आयएसच्या २५ जिहादींचा खात्मा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : सुरूक | तुर्कस्तान-सिरिया सीमेवरील सुरूक शहराच्या बाह्यवस्तीत कुर्द नागरिकांना हुसकावून लावताना तुर्कस्तानचे जवान.
बगदाद/सिडनी - इराक-सिरियामध्ये उच्छाद मांडलेल्या इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांविरुद्ध इराक हद्दीत युद्धक विमानांनी केलेल्या कारवाईत २५ वर जिहादी मारले गेले. मोसूल भागात आयएसच्या तळांवर हे हल्ले करण्यात आले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाची विमाने प्रथमच आयएसविरोधी मोहिमेत सहभागी झाली. मात्र, या विमानांनी रविवारी प्रत्यक्ष हल्ले केले नाहीत.

आयएसविरुद्ध अमेरिकेसह युरोपीय देशांनी एकत्रितपणे मोहीम उघडल्यानंतर इराक हद्दीत करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
मात्र, ही विमाने इराकची होती की अमेरिकेची याची माहिती मिळू शकलेली नाही. ठार झालेल्या अतिरेक्यांचे मृतदेह मोसूल भागात आणण्यात आले आहेत. याच भागात गेल्या जूनमध्ये अतिरेक्यांनी कारवाया सुरू करून मोठ्या प्रदेशावर ताबा मिळवला होता.

कुर्द महिलेच्या आत्मघातानंतर दोन गटांत तणाव
इस्लामिक स्टेटच्या जिहादी गटांनी सिरियाच्या सीमेवर केलेला हल्ला कुर्द बंडखोरांनी रविवारी परतावून लावला. रविवारी एका कुर्द महिलेने आयएसच्या तळावर स्वत:ला बॉम्बने उडवून दिले. यानंतर आयएसने कुर्दविरोधी हल्ले सुरू केले. कुर्द बंडखोरांचा महत्त्वाचा तळ असलेल्या कोबानमध्ये घुसण्याचा आयएसच्या जिहादींनी प्रयत्न केला.
मात्र, हा हल्ला कुर्दांनी परतावून लावला. रात्रभर दोन्ही गटांत तुफान धूमश्चक्री सुरू होती.

उझबेक अतिरेकी आयएसच्या पाठीशी
उझबेकिस्तानमध्ये लढणा-या अल-कायदाच्या जिहादी गटांनी आयएसच्या पाठीशी शक्ती उभी केली आहे. अफगाण हद्दीत अमेरिका तालिबानवर तुटून पडल्यानंतर पाकिस्तान हद्दीतील डोंगरात आश्रय घेतलेल्या तालिबानी गटांच्या नेत्यांनी ही घोषणा केली. उस्मान गाझी या म्होरक्याने ऑनलाइन हे जाहीर करताना इस्लाम आणि गैरइस्लामी यांच्यातील युद्धात आयएसला पूर्ण पाठिंबा असल्याचे गाझी म्हणाले.

पॅलेस्टाइन, मक्का-मदिना आयएसचे लक्ष्य
आपल्या राज्याच्या सीमा अमर्याद वाढवण्याची ईर्षा असलेल्या आयएसची गाझीने स्तुती केली. हा गट हळूहळू इतका वाढेल की आगामी काळात पॅलेस्टाइन आणि मक्का-मदिनावरही आयएसचाच ताबा असेल, असा दावा गाझीने केला. देशभक्ती किंवा राष्ट्रवाद या संकल्पनेपासून आयएस दूर असल्याचे स्पष्ट करून अरब राष्ट्रे, चेचेन्या, उझबेकिस्तान, तझाकिस्तान, किरगिझ, रशियन अशा सर्वच देशांतील लढवय्ये आयएसचे सदस्य असल्याचे गाझी म्हणाला. यात इंग्रजी भाषिक लढवय्ये मोठ्या प्रमाणात असल्याचा दावाही त्याने केला.