आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाकिस्‍तानात चर्चमध्‍ये भीषण बॉम्‍बस्‍फोट; 78 जण ठार, अनेक जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर- केनियात नैरोबी येथे हल्‍लोखोरांकडून गैरमस्लिमांचे हत्‍याकांड घडून काही तास होत नाही, तोच पाकिस्‍तानच्‍या पेशावर शहरात एका चर्चमध्‍ये 2 बॉम्‍बस्‍फोट झाले. स्‍फोटात मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू झाल्‍याची माहिती देण्‍यात आली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, पेशावर शहरातील सर्वात जुन्‍या चर्चला दहशतवाद्यांनी लक्ष्‍य केले. शहरातील गजबजलेल्‍या भागात हा चर्च आहे. या परिसरात बाजारपेठ असल्‍यामुळे प्रचंड गर्दी राहते. त्‍यात मोठ्या संख्‍येने महिलांचा समावेश आहे. आज रविवार असल्‍यामुळे चर्चमध्‍ये प्रार्थनेसाठी अनेक जण येतात. हीच संधी साधण्‍यात आली. स्‍फोट झाला त्‍यावेळेस चर्चमध्‍ये 700 ते 800 जण उपस्थित होते. आत्‍मघातकी हल्‍लेखोराने स्‍वतःला उडवून घेतले. स्‍फोट अतिशय शक्तीशाली होता. चर्चच्‍या जवळपासच्‍या अनेक इमारतींचेही मोठे नुकसान झाले. अनेक इमारतीच्‍या काचा फुटल्‍या.

सुत्रांच्‍या माहितीनुसार, दोन आत्‍मघातकी हल्‍लेखोरांनी स्‍फोट घडविले. स्‍फोटानंतर परिसरात प्रचंड दहशत पसरली. चर्चच्‍या परिसरात सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता. एक हल्‍लेखोराचे शिर बाजुच्‍या इमारतीच्‍या छतावर आढळले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला.

बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळी प्रेतांचा खच पडला होता. शोकाकूल नातलगांचा आक्रोष बघुन मन बधिर होत होते...छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...