आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

25 किलोची स्कूटर फोल्ड करुन सुटकेससारखी कॅरी करा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हंगेरीच्या शहरी भागात स्वस्त आणि सुविधायुक्त प्रवासासाठी विशेष प्रकारे डिझाइन केलेली ही आहे मोव्हियो स्कूटर. सहजपणे फोल्ड करता येणा-या या स्कूटरचे वजन फक्त 25 किलो आहे. फोल्ड केल्यानंतर ही स्कूटर हँडलच्या सुटकेससारखी दिसते. स्कूटरचा कमाल वेग ताशी 44 किमी एवढा आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ती 35
किलोमीटरचे अंतर कापते.

चाकांमध्ये लावलेल्या एका मोटरद्वारे ही स्कूटर चालते. हंगेरीतील अँट्रो ग्रुप या एनजीओने ही स्कूटर तयार केली आहे. अँट्रो ग्रुप पर्यावरणासाठी अनुकूल असणारी वाहने तयार करतो. ही अत्याधुनिक स्कूटर पॅडल मारूनही चालवता येते. येत्या काही महिन्यांत ती बाजारात उपलब्ध होणार आहे. 2008 मध्ये ही स्कूटर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते आणि पाच वर्षांनंतर तिचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.

अँट्रो ग्रुप आता एका अशा भागीदाराच्या शोधात आहे, जो व्यावसायिक स्वरूपात या स्कूटरचे उत्पादन करेल. अँट्रो ग्रुपला मिळणा-या निधीवर स्कूटरची किंमत अवलंबून असेल. निधी चांगला मिळाला तर तिची किंमत 1 लाख 76 हजार रुपये आणि निधी कमी मिळाल्यास तिची किंमत सुमारे 2 लाख 48 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.