आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क - हायटेक सायबर चोरांनी काही तासांत 27 देशांतील एटीएममधील सुमारे 250 कोटी रुपयांची रक्कम साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. हॅकर्सने पहिल्यांदा पेमेंट प्रोसेसिंग कंपन्यांच्या संगणक प्रणालीस हॅक केले. त्यानंतर मॅग्नेटिक कार्ड्सने एकाच वेळी अनेक देशातील एटीएमवर हात मारला. न्यूयॉर्क शहरातील ही सर्वात मोठी चोरी आहे. तोंडावर मास्क किंवा इतर साहित्य वापरण्याऐवजी घटनेत सायबर चोरांनी लॅपटॉप, इंटरनेटचा वापर केला आहे, असे अमेरिकेतील सरकारी वकिलाने गुरुवारी सांगितले. दरम्यान, ब्रुकलिनमध्ये संशयित आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
न्यूयॉर्कमध्ये पैसे लांबवणा-या टोळीचा 23 वर्षांचा म्होरक्या आहे. अलबर्टे असे त्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह गेल्या महिन्यात सापडला होता.
भारतीय कंपन्यांना धक्का
1. हॅकर्सने भारतीय पेमेंट प्रोसेसिंग कंपनीच्या सिस्टिम हॅक केल्या. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीची विथड्रॉल लिमिट वाढवली. या बँक खात्यांची माहिती 20 देशांत पसरलेल्या सायबर टोळीला देण्यात आली. 21 डिसेंबर रोजी जगभरातील 4500 एटीएममधून 30 कोटी रुपये चोरण्यात आले.
2.हॅकर्सने या वेळी अमेरिकी पेमेंट प्रोसेसिंग कंपनीची संगणक प्रणाली हॅक केली. ओमनमधील बँक आॅफ मस्कटच्या 12 अकाउंटमधून जारी कार्ड्सची मर्यादा वाढवली. 19-20 फेब्रुवारी 2013 दरम्यान सुमारे 10 तासांत 36 हजार व्यवहारांच्या साह्याने 220 कोटी रुपयांचा डल्ला मारला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.