आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये मुंबईसारख्या अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा कट ब्रिटनमध्ये रचण्यात आला होता. माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर आणि त्यांची पत्नी चेरी यांची मालमत्ता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती.

या प्रकरणाशी संबंधित एक संशयित इरोल इंसिडलला मंगळवारी कडक सुरक्षा बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. इंसिडल २६ वर्षांचा आहे. त्याच्या आयफोनच्या वॉलपेपरवर दहशतवादी संघटना आयएसआयएसचा झेंडा होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. त्याच्या संगणकावर बंदुकीशी संबंधित कोड आढळून आला होता. तो अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करण्याचा कट आखत होता. इंसिडलने आरोप फेटाळले आहेत.
प्रकरण संवेदनशील असल्यामुळे खटल्याची सुनावणी बंद खोलीत होत आहे. त्याआधी ब्रिटिश पोलिसांनी मंगळवारी तीन महिलांसह सहा संशयित अतिरेक्यांना अटक केले होते. या सर्वांचा संबंध सिरियातील यादवी व इराकमधील अतिरेकी हल्ल्याशी आहे. लंडनचा दक्षिण किनारा पोर्टस माऊथ आणि पश्चिम किनारा फर्नवारो येथे त्यांना अटक करण्यात आली. २३ ते ५७ वयोगटातील हे अतिरेकी आहेत. पोलिसांनी अतिरेकीविरोधी मोहिमेअंतर्गत त्यांची अटक केली आहे.

५०० ब्रिटिश तरुणांची अतिरेक्यांना मदत
ब्रिटनमधील जवळपास ५०० तरुण अतिरेक्यांची मदत करत आहेत. इस्लामी स्टेट अतिरेक्यांच्या ताब्यात काही ब्रिटिश नागरिक आहेत. आयएसने आपणाशी थेट संपर्क करावा. व्हिडिओ जारी करून स्वकीयांची हत्या करू नये, अशी विनवणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

इराक व कुर्द जवानांमध्ये ब्रिटन समन्वय करणार
इस्लामिक स्टेटच्या विरोधातील (आयएस) युद्धात इराक सुरक्षा दल आणि कुर्द गटांमध्ये समन्वय राखण्याची भूमिका ब्रिटन बजावणार आहे. आयएसविरोधातील लढ्यात ब्रिटन प्रभावी भूमिका बजावू शकतो, मात्र ते इराकी सुरक्षा दलाचे स्थान घेऊ शकत नसल्याचे इराकचे परराष्ट्रमंत्री अल जाफरीन यांनी स्पष्ट केले.