आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Mumbai Attack Case Pakistan Court Committee Mumbai Visit

26 / 11 : पाकिस्तानी चौकशी आयोग 3 फेब्रुवारीस भारतात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानचा न्यायालयीन आयोग 3 फेब्रुवारीपासून भारत दौ-यावर येणार आहे. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असेल. या काळात आयोग भारतीय तपास अधिका-यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.
3 ते 6 फेब्रुवारीदरम्यान हा आयोग भारत भेटीवर जाणार असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलीक यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे. भारताचे उच्चायुक्त शारत सभरवाल यांनी रहेमान यांची भेट घेतली. त्या प्रसंगी गृहमंत्र्यांनी भेटीची ही तारीख जाहीर केली. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आयोगाला पाठवण्यात यावे, अशी विनंती भारताने यापूर्वीच पाकिस्तानकडे केली होती. त्यानुसार पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.
रहेमान व सभरवाल यांच्यातील बैठकीत द्विपक्षीय संबंधाबरोबरच मुंबई हल्ल्यातील सहभागी संशयित सात पाकिस्तानी यांच्यावरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानात पकडण्यात आलेले व खटला सुरू असलेल्या सात जणांवरील पुढील कारवाईपूर्वी न्यायालयीन आयोगाची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर संशयितांवर ठोस कारवाई होऊ शकते. दुसरीकडे लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या झाकीर रहेमान लखवी याच्यावरील सुनावणी गेल्या वर्षभरापासून स्थगित करण्यात आली आहे.

कसाबचा कबुली जबाब महत्त्वाचा : 26 / 11 प्रकरणी एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबचा कबुली जबाब नोंदवण्यात आलेला आहे. हा जबाबच पाकिस्तानी कायदे पंडित महत्त्वाचा पुरावा म्हणून उपयोगात आणू शकतात. या खटल्यात भारतातील तपास करणारे पोलिस अधिकारीही आयोगाची भेट घेणार आहेत. या आयोगात संरक्षण विभागातील किमान पाच वकिलांचा समावेश आहे. दुसरीकडे लष्कर ए- तोयबाचा म्होरक्या लखवी याच्या वकिलाचा मृत्यू झाला. 2008 च्या नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेच्या सरकारी वेबसाइटवर हॅकर्सचा हल्ला
26/11चा हल्ला व कवित्व