आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Mumbai Terrorist Attack Hearing At Pakistan

26/11 हल्ल्याची सुनावणी तहकूब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- मुंबईवरील 26 / 11 च्या हल्ला खटल्याची सुनावणी पाकिस्तानात 16 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयीन आयोगाच्या टीमने भेट दिल्याचे भारतीय अधिकार्‍यांकडून दुजोरा मिळेपर्यंत हा खटला दोन आठवडे स्थगित करण्यात आला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश चौधरी हबिब उर-रहेमान यांनी हा खटला पुढे ढकलल्याचे स्पष्ट केले. भारताकडून भेटीला दुजोरा मिळाल्यानंतरच मुंबईवरील हल्ल्यातील महत्वाच्या चार साक्षीदारांची उलटतपासणी करण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळणार आहे. आम्ही भारत सरकारच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करत आहोत, असे संरक्षण विभागाचे वकील रियाझ छीमा यांनी सांगितले. मुंबईला आयोगाच्या प्रतिनिधींनी भेट दिली होती.