आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 हल्ल्यानंतर सुटत आला होता भारताचा संयम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर असाच दुसरा हल्ला झाल्यास भारत संयम पाळणार नाही, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना निक्षून सांगितले होते. हिलरी यांच्या हार्ड चॉइसेस पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या भेटीचा संदर्भ देत त्यांनी वरील बाब उघड केली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानप्रति संयम पाळणे किती कठीण आहे, याची जाणीव दोन्ही नेत्यांनी करून दिली होती. पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी मुंबईच्या विविध भागांत दहशतवादी हल्ले चढवले होते. यामध्ये 166 नागरिक ठार झाले होते. 9/11 च्या धर्तीवर हा हल्ला 26/11 ठरवण्यात आला आहे.
भारतीय लोकांप्रति सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आपण मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये थांबणे पसंत केले होते, असे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे. त्यांच्या पुस्तकाला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

आयएसआयवर अविश्वास
अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनविरुद्ध अबोटाबादमध्ये करण्यात आलेल्या कारवाईची माहिती आयएसआयमुळे पाकिस्तानला सांगण्यात आली नसल्याचे हिलरी यांनी आपल्या हार्ड चॉइसेस पुस्तकात म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष ओबामा आणि तत्कालीन संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांच्यात या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्या स्थितीत पाकिस्तानच्या भारतावर हल्ला करण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली होती.