आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Trial Of Pak Suspects Adjourned Till July 20

26-11 हल्ल्याची सुनावणी तहकूब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - मुंबई हल्ल्यातील सात आरोपींविरुद्ध पाकिस्तानी दहशतवाद विरोधी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी 20 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. सात आरोपींपैकी चार जण न्यायालयात हजर नसल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली. हमझा बिन तारिक,मुहंमद अली,मुहंमद सैफुल्लाह खान आणि उमर दराज खान या चार आरोपींची शनिवारी उलटतपासणी होती,परंतु ते गैरहजर असल्यामुळे न्यायाधीश कौसर अब्बास झैदी यांनी सुनावणी तहकूब केली. कराची ते इस्लामाबाद प्रवास परवडत नसल्यामुळे न्यायालयात हजर राहू शकत नाही. प्रवास खर्च देण्यात यावा अशी विनंती आरोपींनी केली होती.त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने फेडरल तपास संस्थेला दिले आहेत.