आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टुअर्ट चालवतो ताशी 267 किलोमीटर वेगाने बाइक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टुअर्ट गन हे स्कॉटिश नागरिक सर्वाधिक वेगाने बाइक चालवणारे अंध व्यक्ती आहेत. ताशी 267 किलोमीटर वेगाने बाइक चालवून त्याने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. 11 वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांना पक्षाघात झाला होता. त्यावेळी त्यांना कधीही चालता येणार नाही तसेच बाइकसुद्धा चालवता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र स्टुअर्ट यांनी दोन वर्षांतच काठीच्या मदतीने चालायला सुरुवात केली. खूप मेहनत केली. पण त्या अपघाताच्या दुष्परिणामांमुळे 2008 मध्ये ते अंध झाले. तरीही त्यांनी हार मानली नाही. हळूहळू उजव्या हातात 40 टक्के चेतना आली. पण पाय असल्याची जाणीवच होत नव्हती. एक दिवसाचे जागतिक विक्रम प्रस्थापित करतील, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. स्टुअर्ट यांनी बिली बॅक्स्टरमधील वर्ल्ड लँड स्पीड रेकॉर्डविषयी ऐकले होते. त्या स्पर्धेत सहभागी झाले आणि विजेतेही ठरले. स्टुअर्ट यांच्या वडिलांनी या स्पर्धेसाठी त्यांची तयारी करून घेतली. ते स्टुअर्टसोबत बाइक चालवत असत. इंटरकॉमच्या मदतीने त्यांना ब्रेक कधी लावाययचा, कधी गिअर बदलायचा, याचे मार्गदर्शन करत असत.