आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिनजियांग हल्ल्यातील २७ जणांना फाशी, चीनच्या न्यायालयाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या एका न्यायालयाने शिनजियांगमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींपैकी २७ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. नऊ अतिरेक्यांना जन्मठेप व २० जणांना प्रत्येकी २० वर्षे तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.

शिनजियांगच्या दक्षिण भागात २८ जुलै रोजी हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये ३७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा जवानांनी ५९ अतिरेक्यांचा खात्मा केला होता. न्यायालयाने सोमवारी ज्या अतिरेक्यांना शिक्षा सुनावली त्यांच्या नावावरून सर्व उईघूर मुस्लिम असल्याचे दिसून येते. न्यायालयाने त्यांना दहशतवाद, अपहरण तसेच स्फोटक पदार्थ बनवण्यात दोषी ठरवले आहे. फाशीच्या शिक्षेपैकी १५ जणांच्या शिक्षेवर स्थगिती आणली आहे. अतिरेक्यांनी कशा पद्धतीने रस्ते जाम केले आणि लोकांना वाहनांतून ओढत बेदम मारले याबद्दल निकालात स्पष्ट करण्यात आले आहे.

शिनजियांग उईघूर मुस्लिमांचा गड
चीनचे पश्चिम राज्य शिनजियांग उईघूर मुस्लिमांचा गड मानले जाते. येथे चीनचे हान नागरिक व उईघूरमध्ये चकमक उडते. दोन वर्षांच्या संघर्षात शेकडो नागरिक ठार झाले आहेत. चीन सरकार कोणत्याही ठिकाणी झालेल्या हल्ल्यासाठी उईघूर मुस्लिमांना दोषी धरते.