आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 28 Illetarate Citizens In India, United Nation Report

भारतात 28 कोटी नागरिक आहेत निरक्षर, संयुक्त राष्‍ट्राच्या अहवालात स्पष्‍ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्‍ट्रे - भारताची निरक्षर प्रौढ नागरिकांची लोकसंख्या जवळपास 28 कोटी 70 लाख असून जागतिक लोकसंख्येमध्ये हे प्रमाण 37 टक्के असल्याचे संयुक्त राष्‍ट्राच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अहवालामध्ये देशातील गरीब-श्रीमंतांच्या शैक्षणिक स्तरावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
2013-14 च्या शैक्षणिक अहवालात भारताचा साक्षरतेचा दर 1991 मधील 48 टक्क्यांवरून 2006 मध्ये 63 टक्क्यांवर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, लोकसंख्या वाढीमुळे साक्षरतेचे अपेक्षित उद्दिष्ट गाठता येत नाही. परिणामी, निरक्षर प्रौढांच्या संख्येत घट येत नाही. संयुक्त राष्‍ट्राच्या शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक 28 कोटी 70 लाख प्रौढ निरक्षर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महाराष्‍ट्र आणि तामिळनाडूमध्ये बहुतांश ग्रामीण मुलांनी 2012 पर्यंत इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. महाराष्‍ट्रातील इयत्ता पाचवीचे 44 टक्के ग्रामीण मुले आणि तामिळनाडूतील 53 टक्के मुले दोन अंकी संख्येची वजाबाकी करू शकत असल्याचे दिसून आले.
भारत आणि नायजेरियामध्ये महिलांच्या शिक्षणावर भर दिल्यास अनेकांचे प्राण वाचतील, असे निरीक्षण संयुक्त राष्‍ट्राने नोंदवले आहे. 2012 मध्ये भारतात पाच वर्षांखालील 14 लाख, तर नायजेरियात 8 लाख मुलांचा मृत्यू झाला.