मोम्बासा - केनियामध्ये बंदुकधा-यांनी लामू भाउंटी आणि ताना खिर कौंटीवर केलेल्या गोळीबारात 29 जणांची हत्या करण्यात आली. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना अल शबाबने घेतली आहे. बंदुकधा-यांनी हिंदी व्यापार केंद्रावर केलेल्या अंधाधुंदी गोळीबारात नऊ लोकांची हत्या करण्यात आली, असे केनियाच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ता वेंडा नझोक यांनी सांगितले. मागील महिन्यात झालेल्या हल्ल्यात 65 लोकांची हत्या करण्यात आली होती. 10 ते 15 च्या संख्येने असणा-या हल्लेखोरांनी सरकारी अधिका-यांना लक्ष्य करून गोळीबार केली आणि काही इमारतींना आग लावली. ताना खिर कौंटीमध्ये 20 लोकांची हत्या करण्यात आली आहे, असे लामू कौंटीचे कमिश्नर मिरी निझेंगा यांनी सांगितले.
या सशस्त्र बंदूकधा-यांनी केनियात अनेक हल्ले केली आहेत. सप्टेंबर, 2013 मध्ये झालेल्या राजधानी नैरोबीमधील वेस्टगेट शॉपिंग मॉलवरील हल्ल्यात 67 लोक मारली गेली.
पुढील स्लाइड्सवर पाहा अल शबाबच्या हल्ल्यानंतरची छायाचित्रे....