आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाईत विमान अपघातात 3 जणांचा मृत्‍यू, दोन जण गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होनोलूलू- हवाई व्‍दीपकल्‍पामधील लनाई विमानतळाजवळ विमान दुर्घटनेत 3 जणांचा मृत्‍यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर असल्‍याचे माई काऊंटीचे प्रवक्‍ता रोड एंटोन यांनी सांगितले आहे.

ही दुर्घटना बुधवारी रात्री 9.30 वाजता घडली. एंटोन यांनी प्रसिध्‍दी माध्‍यमांशी बोलतांना सांगितले, की विमानाने उड्डाण घेतल्‍यानंतर लवकरच ही दुर्घटना घडली. यामध्‍ये तीन जणांचा मृत्‍यू झाला तर अन्‍य तीन व्‍यक्‍ती जखमी झाल्या. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दुर्घटनेत मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तींची नावे अजून स्‍पष्‍ट झालेली नाही. विमानतळापासून दीड किलोमीटर अंतरावर घडलेला या दुर्घटनेमध्‍ये बचाव कार्य सुरू असल्‍याचे, अग्निशमक दलाचे मुख्‍य अधिकारी मेनेगा यांनी सांगितले.