आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 Year Old Girl Donated Her Hair To Kids With Cancer

VIDEO: तीन वर्षाच्या चिमुरडीने कॅन्सरग्रस्त मुलांसाठी केस केले दान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वर्षाच्या लहान मुलांमध्येही माणुसकी असते हे सिद्ध केले आहे टॉरँटोची रहिवासी असणा-या एमिली जेम्सने. कॅन्सग्रस्त मुलांचे विग तयार करण्यासाठी तिची सात इंचाची वेणी कापली. ऐवढेच नाहीतर तीने तिचे केस कॅनडातील कॅन्सर सोसायटीला पाठवले आहेत. यूट्यूबवर ही डॉक्यूमेंट्री 13 दिवसात 18 लाख लोकांनी पाहिली आहे.
एमिली व्हिडीओ संदेश देताना म्हणते, की एखादे लहान मुलाला केस नसलेले मला आवडणार नाही. मी त्यांच्यासाठी जास्त काही करू शकत नसल्यामुळे मी माझे केस त्यांना दान केले आहेत. कॅन्सरग्रस्ताचे केस वापरले जात नाहीत त्यामुळे त्यांच्या विगसाठी आपण केस दान करावेत असे एमीची आई म्हणते.
केस सुंदर दिसावेत म्हणून एमिली अनेकदा सलूनमध्ये येत असल्याचे तिचे केस कापणारा मैथिव सांगतो. परंतू यावेळी सलूनमध्ये येण्याचे तिचे कारण मात्र वेगळे होते. सर्व मुलींसारखेच एमिलीला तिचे केस फार प्रिय होते मात्र इतरांना मदत करण्यासाठी ती अशाप्रकारे केस कट करेल अशी अपेक्षा नसल्याचे तो सांगतो.