आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 yr old Boy Shoots, Kills 18 month old Brother In US

3 वर्षाच्या बालकाने चुकून गोळी झाडल्याने 18 महिन्यांचा लहान भाऊ जागीच ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजल्स : एका तीन वर्षाच्या बालकाने खेळताना हँडगनमधून चुकीने गोळी झाडल्याने तीन अठरा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमेरिकेत घडली आहे. हँडगनला लॉक केलेले नसल्याने या चिमुरड्याकडून हा प्रकार घडला आहे. गेल्या दोन महिन्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.
अरिझोना प्रांतातील पायसन येथे ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही मुले आपल्या आई बरोबर शेजा-याकडे गेलेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातील गनने हा प्रकार घडला, असे पोलिसांनी सांगितले. ज्यांच्या घरी ते गेले होते, त्यांच्याकडे असणा-या सेमी ऑटोमॅटिक गनने हा प्रकार घडला त्यावेळी ही गन लॉक करण्यात आलेली नव्हती.
पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिस घटनास्थळाक़डे रवाना झाले. ज्यावेळी पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी या मुलांची आई आपल्या मुलाला जखमी अवस्थेत बाहेर काढत होती. त्यानंतर या मुलाला पायसन येथील मोडीकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असे पोलिसांनी सांगितले.
ज्या अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला ते अपार्टमेंट या मुलांच्या आई वडीलांच्या मित्राचे होते. ही मुले आईबरोबर 10 ते 15 मिनिटांसाठीच त्याठिकाणी गेले होते. याच दरम्यान त्या लहान मुलाच्या हाती ही सेमी ऑटोमॅटिक हँडगन लागली. तिच्याबरोबर खेळताना चुकून त्यातून गोळी झाडरली गेली आणि ती थेट त्या बाळाला लागली.