आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनमध्ये रक्तपात, 40 फुटीरतावादी ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनेत्सक - युक्रेनच्या पूर्व भागातील डोनेत्सक शहरातील विमानतळावर युक्रेनने पुन्हा ताबा मिळवला आहे. सोमवारी रशियन समर्थक बंडखोरांनी सुरक्षा रक्षकांना विमानतळ सोडण्यास भाग पाडले होते. या वेळी दोन्ही गटात धुमश्चक्री झाली होती. विमानतळ संपूर्ण नियंत्रणात असून शत्रूंचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या बाजूचे काहीही नुकसान झाले नसल्याचे अंतर्गत सुरक्षामंत्री अर्सेन अवाकोव्ह यांनी म्हटले आहे.
मंगळवारी सकाळी विमानतळ परिसरात गोळीबार आणि स्फोटाचे आवाज घुमत होते. या कारवाईत 38 बंडखोर आणि दोन नागरिक ठार झाल्याची माहिती डोनेत्सकचे महापौर ओलेकसॅन्ड्र लुकयानचेन्को यांनी सांगितले. मात्र, आमचे काहीही नुकसान झाले नसल्याचे बंडखोरांनी म्हटले आहे.
विमानतळ रस्त्यावर गोळ्यांनी छलनी केलेल्या ट्रकमध्ये मृतांचे अवयव विखुरल्याचे दिसून आले. दरम्यान, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव्ह यांनी संघर्ष थांबविण्याचे आवाहन सर्व संबंधितांना केले आहे. राष्ट्राध्यक्षपद निवडणूक निकाल विचारात घेता
लष्कराने तत्काळ बळाचा वापर बंद करावा, असे लावारोव्ह म्हणाले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, का झाला हिंसाचार..