आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 30 Terrorists Killed In Pakistan Military Air Attack

हवाई हल्ल्यात पाकमध्ये ३० अतिरेक्यांचा खात्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात लष्कराने केलेल्या कारवाईत मंगळवारी दहशतवाद्यांच्या एका कमांडरसह ३० जण ठार झाले. लष्कराने गेल्या अनेक दिवसांपासून या भागात दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.

हाफिज गुल बहादूर याच्यासोबत सरकारने २००६ पासून शांतता करार केला होता. तेव्हापासून लष्कराने या दहशतवादी गटाला लक्ष्य केले नव्हते. बहादूर हा हक्कानी गटाचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे लष्कराने त्याच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. लष्कराच्या लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. उत्तर वझिरिस्तान भागात ही कारवाई सुरू आहे. तळावर दडून बसलेले सर्व दहशतवादी ठार झाले आहेत किंवा उर्वरित जखमी झाल्याचे लष्कराकडून जाहीर करण्यात आले.