आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 300 Injured, One Dead After Strong Earthquake In China

चीनमध्ये 6.4 रिश्टर तीव्रतेचा भूकंप; एक ठार, 92 हजारांवर नागरिकांना फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - भूकंपानंतर चीनच्या लिकेंग शहरात नागरिक रस्त्यावर आले होते.

जिंगू - चीनच्या युनान प्रांतात मंगळवारी रात्री उशीरा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या भुकंपात एक जण ठार झाला असून सुमारे 300 हून अधिक नागरिक जखमी आहेत. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जण ठार झाले आहेत.
स्थानिक वेळेनुसार रात्री 9.49 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. यूनाइटेड स्टेट जियॉलॉजिकल सर्व्हीसने दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर भुकंपाची तीव्रता 6.4 एवढी होती. भूकंपाचे केंद्र यूनिजिन्घॉन्गहून 163 किलोमीटर अंतरावर जमिनीखाली 10 किलोमीटरवर होते. भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान जिन्ग्गू कौंटी आणि लिकेंग शहरात झाले आहे.

स्थानिक अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार जिंगू कौंटीमध्ये 92,000 नागरिकांना भूकंपाचा फटका बसला आहे. येथून सुमारे 56,880 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हजारो घरांचेही या भूकंपात मोठे नुकसान झाले आहे. तसेच परिसरात वीज आणि दूरसंचार व्यवस्थाही ठप्प झाली आहे. मदतकार्य सुरू असून 600 स्वयंसेवकांची टीम स्निफर डॉग्सबरोबर तैनात आहे. तसेच 3,200 सैनिकांचे पथकही मदत कार्यात सहभागी झाले आहे. शिन्हुआ न्यूज एजंसीच्या वृत्तानुसार प्रांत अधिका-यांनी सर्वोच्च आपातस्थिती असल्याची घोषणा केली आहे.

पुढे पाहा, भूकंपानंतरच्या स्थितीचे PHOTO