आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 वर्षांपूर्वींचा दोन कोटी रूपये किमतीचा खजिना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन संपत्तीवर संशोधन करणा-या एका कुटुंबाला फ्लोरिडाच्या किना-यावर 300 वर्षांपूर्वीचा एक खजिना सापडला आहे. या खजिन्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. 1715 मध्ये हरीकेन वादळात सापडलेल्या 11 स्पॅनिश जहाजांवरील सोने या खजिन्यात असल्याचा अंदाज आहे. शॅमिट कुटुंबीय आणि डेल जेक नावाच्या एका पाणबुडीने हा खजिन्याचा शोध लावला आहे. शॅमिट यांच्या मुलाने 2002 मध्ये तिस-या शतकातील प्राचीन चांदीचे नाणे शोधून काढले होते. ते सुमारे 16.58 लाख रुपये किमतीचे होते. फ्लोरिडा सरकारतर्फे खजिन्यातील 20 टक्के सोने संग्रहालयात ठेवले जाईल. उर्वरित भाग शॅमिट कुटुंबीय आणि त्या परिसरात पाणबुडी चालवण्याची परवानगी असलेल्या कंपनीत विभागला जाईल.
designntrend.com