आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानात मुसळधार पाऊस, 33 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानातील पश्चिमोत्तर भागात मुसळधार पावसाने आणि हिमवर्षावामुळे आतापर्यंत 33 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. पावसामुळे जनजीवन आणि वाहतूक पूर्णपणे विस्‍कळीत झाली आहे.

जिओ टीव्‍हीने दिलेल्‍या वृत्तानुसार ठार झालेल्‍या 33 व्‍यक्‍तींपैकी 25 जण खैबरपख्‍तूनवा प्रांतातील आहेत. देशाच्‍या पश्चिम भागात सुमारे 40 लोक जखमी झाले आहेत. पहाडी भागात लोकांनी पावसापासून वाचण्‍यासाठी मस्जिदचा आसरा घेतला आहे.

जसवंत सिंग भागातील अनेक घरांची छते कोसळल्‍यामुळे सात जण ठार झाले आहेत. पिंडी भ‍ट्टी येथील एका हॉटेलचे छत कोसळल्‍यामुळे एका व्‍यक्‍तीचा मृत्‍यू तर तीन जण जखमी झाले आहेत. पेशावर येथील गुलाम गावातील एका घराचे छत पडल्‍यामुळे दोन बहिणींचा मृत्‍यू झाला आहे. या दुर्घटनेत मुलींचे आई-वडील आणि दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. अशाच घटना देशातील अनेक भागात घडल्‍या आहेत.