आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकमध्ये तीन स्फोटात ३४ जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकची राजधानी बगदाद येथील शियाबहुल परिसरात भीषण कार बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला, तर कमीत कमी ४४ जण जखमी झाले.शनिवारी रात्री हा स्फोट घडवण्यात आला. एका पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी हल्लेखाेराने शौलाजवळील जास्त गर्दीच्या बाजारात स्वत:च्या कारमध्ये स्फोट घडवला. या शक्तिशाली स्फोटात कमीत कमी १५ जणांचा मृत्यू झाला. याच बाजारात अर्धा तास आधी मोठा स्फोट झाला होता. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले.