(फोटो- कोरोम गावाजवळ पडलेले खाण मजुरांचे मृतदेह)
नैरोबी- केनियातील सोमालियाच्या सीमेवर असलेल्या मंडेरा शहरातील एका खाणीवर अल शबाब दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 36 निष्पाप मुस्लिम मजुरांची निर्घुण हत्या करण्यात आली.
मंडेरा शहरापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरोम गावाजवळ ही खाण आहे. यापूर्वी अल शबाबच्या दहशतवाद्यांनी नैरोबी जाणार्या एका बसचे अपहरण करून बसमधील 28 प्रवाशांची निर्घृण हत्या केली होती. पोलिसांनी मोम्बासा येथील तळावर छापेपारी केली होती. त्यामुळे संतप्त दहशतवाद्यांनी हत्याकांड घडवून आणले होते.
दरम्यान, केनियात अनेक दहशतवादी संघटना गेल्या काही वर्षांपासून संक्रीय झाल्या आहेत. इस्लामी कट्टरवाद्यांशी लढण्यासाठी केनिया फोर्स आणि अफ्रिकन यूनियन फोर्स एकत्र आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, घटनेची भीषणता दर्शवणारे छायाचित्रे...