आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 36 Reported Dead In Bus Hits Truck On Mexico Highway

मॅक्सिकोमध्ये बस-ट्रकची भीषण टक्कर; 36 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅक्सिको सिटी- पूर्व मॅक्सिकोमधील व्हेराक्रुजमध्ये एक खासगी बस आणि ट्रकची भीषण टक्कर होऊन झालेल्या
दुर्घटनेत 36 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त ताबास्कोमधील व्हिलाहर्मोसाहून मॅक्सिको सिटीला येत
होती. महामार्गाच्या कडेला उभ्या उसलेल्या ट्रकवर ही बस आदळली. टक्कर होताच बसला भीषण आग लागली. कोसामालोआपान आणि अकायूकानला जोडणार्‍या महामार्गावर ही दुर्घटना घडली.

यात 34 प्रवाशांचा मृत्यू झाला असून चार जण थोडक्यात बचावले आहे. मृतांमध्ये बहुतांश व्यापारी आहेत.
स्टेट सिव्हिल डिफेन्स एजन्सीचे संचालक रिचर्ड माजा लिमन यांनी सांगितले की, सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू
झाला आहे. मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरीक पेन नीतो यांनी 'ट्‍विटर'च्या माध्यमातून शोकसंदेश पाठवून दु:ख व्यक्त केले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, या दुर्घटनेची भीषणता...