आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यात 38 पोलिस ठार, तर 62 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वेटा - पाकिस्तानच्या क्वेटा शहरामध्ये गुरुवारी पोलिस अधिका-याच्या अंत्यविधीसाठी एकत्र आलेल्या लोकांवर निशाणा साधत दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये 38 जण ठार तर 62 जखमी झाले. मृतांमध्ये क्वेटाचे पोलिस उपमहानिरीक्षक फैजाय संबलसह पाच वरिष्ठ अधिका-यांचा समावेश आहे. मृतांमध्ये काही लहान मुले आहेत. कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.


पोलिस अधिकारी मोहिबुल्लाह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलिस लाइन्स भागातील मशिदीबाहेर 300 नागरिक रांगेत उभे होते. हल्लेखोर बॉल बेअरिंग व खिळ्यांनी भरलेले स्फोटकाचे जॅकेट घालून आला होता. हल्लेखोर रांगेतील लोकांजवळ पोहोचला. संबल यांनी त्याला पहिल्यानंतर पकडण्याचे आदेश दिले. जवान त्याच्याजवळ पोहोचल्यानंतर स्फोटकाचे बटण दाबले. यात संबल गंभीर जखमी झाले.