आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी बसून अनुभवा अंतराळ स्टेशनचा प्रवास, नासाने प्रसारित केला ISS चा थ्री-डी व्हिडियो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: इंटरनॅशनल स्पेस स्टेशन

वॉश्गिंटन - तुम्हाला जर अंतराळात फिरायची आवड असेल तर, तुमची ही इच्छा नासाने पूर्ण केली आहे. होय आता तुम्ही घरात कमप्युटरसमोर बसून अंतराळात फिरू शकणार आहात. अमेरिकेची अंतराळ एजेंन्सी नासाने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर थ्री-डी व्हिडियोची एक नविन प्लेलिस्ट पोस्ट केली आहे.
प्रसारीत करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शून्य गुरुत्वाकर्षणात अंतराळवीर कसे काम करतात याचा अनुभव बघता येणार आहे. तसेच अंतराळवीरांचे काम करण्याचे कक्ष कसे असेते हे दाखवण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही अंतरराळ स्टेशनवर राहणे आणि तेथे काम करण्याची वास्तविक प्रतिकृतिची छायाचित्रे पाहू शकणार आहात.

या छायाचित्रांमध्ये सर्वात पहिले दृश्य अंतराळ स्टेशन आणि अंतराळ यात्रा करणा-यांची आहेत. यामध्ये थ्रीडी आणि एचडी कॅम-यासोबत अंतराळ यात्री सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात पाण्यासाठी संघर्ष करताना पाहू शकतात.