आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 40 Meter Long Tunnel Digged For Smuggling In China

It's Amazing: चीनमध्ये तस्करीसाठी खोदले 40 मीटर लांबीचे भुयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळ्या धंद्याला अधिक बळकटी देण्यासाठी तस्करांनी हाँगकाँगपासून ते शेनजेनपर्यंत 40 मीटर लांबीचे भुयार खोदल्याची घटना चीनमध्ये उघडकीस आली आहे. शेनजेन प्रांतातील एका मोडकळीस आलेल्या गॅरेजमधून हे भुयार खोदण्यात आले होते. पोलिसांच्या मते, या भुयाराद्वारे विदेशी मोबाइल्स आणि इलेक्ट्रिकल साहित्य आयात करण्याचा तस्करांचा उद्देश होता. अशा वस्तूंच्या आयात-निर्यातीसाठी सीमेवर शुल्क आकारले जात असल्यामुळे तस्कर अशा छुप्या मार्गांचा अवलंब करतात. या घटनेचा उलगडा आठवडाभरापूर्वीच करण्यात आला, परंतु माध्यमांना याची आता माहिती मिळाली. पोलिसांनी गॅरेजच्या मालकाला अटक केली आहे.
भुयारात रेल्वे ट्रॅक, लाइटही
भुयाराची उंची 1 मीटर असून ते 0.8 मीटर रुंद आहे. यातून एक व्यक्ती घसरत जाऊ शकते. भुयारात सिमेंट काँक्रीटने बांधकाम करण्यात आले असून प्रकाशासाठी लाइट्सही बसवण्यात आले आहे. सामानाची ने-आण करण्यासाठी रेल्वे ट्रॅकही यात बसवला होता. याचे परिचालन रिमोटच्या माध्यमातून केले जाणार होते.